Join us
Daily Top 2Weekly Top 5

​हॉलिडे टाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:01 IST

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत अंशुमन मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारत असल्याने त्याला महिन्यातील 20-25 दिवस तरी चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे ...

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत अंशुमन मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारत असल्याने त्याला महिन्यातील 20-25 दिवस तरी चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबियांना, प्रेयसीला वेळ द्यायला मिळत नाही. त्याची प्रेयसी सानया अनेकवेळा सेटवर येऊन त्याची भेट घेते. नुकताच चित्रीकरणातून वेळ काढून अंशुमन त्याच्या प्रेयसीसोबत गोव्याला फिरायला गेला होता. तो सांगतो, "भारतात फिरण्यासारख्या अनेक जागा अाहेत. गोवा तर खूपच छान आहे. मी आणि सान्याने एकमेकांसोबत खूपच चांगला वेळ येथे घालवला. पुढे चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास हिमाचलला जाण्याचा माझा विचार आहे. मी आणि सान्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. पूर्वी आम्ही केवळ फ्रेंड्स होतो. पण आता आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आहे. सान्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. पण ती मनाने एखाद्या लहान मुलासारखी असल्याने हे मला कधीच जाणवत नाही."