सलमान खान, शाहरूख खान यांच्याप्रमाणेच आता छोट्या पडद्यावरील कलाकार सोशल मिडीयावरही सुपरहिट ठरताहेत. कॉमेडी किंग कपिल शर्माचे सोशल मिडियावर तब्बल चाळीस लाख फॉलोअर्स आहेत. दिवसेंदिवस त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतेच आहे. सोशल मिडियावर इतकी लोकप्रियता मिळणा-यांमध्ये फक्त कपिल शर्माच नसून, आणखी काही कलाकारांचाही समावेश आहे. दिव्यांका त्रिपाठीला लग्नानंतर तिच्या चाहत्यांनी फॉलो केले. त्यापूर्वी ती दिव्यांका सोशल साइटवर अॅक्टीव्ह नव्हती. मात्र लग्नाच्या वेळी तिची सोशल मीडियावर तिची फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली. तर दुसरीकडे नागीन फेम मौनी रॉय सगळ्यात जास्त चर्चेत आली ती तिच्या हॉट फोटोमुळे. कपिल, दिव्यांकाप्रमाणेच आता मौनी रॉयच्याही फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सोशल साईटसवरही सद्या याच कलाकारांचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे कलाकार ठरतायेत छोट्या पडद्यावर हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:07 IST