Join us
Daily Top 2Weekly Top 5

हितेन नैतिकच्या भूमिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 15:03 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱया करण मेहराने त्याच्या तब्येतीच्या कारणावरून ही मालिका काही दिवसांपूर्वी ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱया करण मेहराने त्याच्या तब्येतीच्या कारणावरून ही मालिका काही दिवसांपूर्वी सोडली. नैतिक ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे करणची जागा आता कोण घेणार हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे. कुटुंब फेम हितेन तेजवानीला या भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचे कळतेय. हितेन गेल्या कित्येक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याच्या अनेक मालिका गाजलेल्या आहेत. त्याची लोकप्रियता पाहाता प्रेक्षक त्याला नैतिकच्या भूमिकेत स्वीकारतील असे प्रोडक्शन हाऊस आणि वाहिनीमधील मंडळींना वाटत आहे. त्यामुळेच त्याला या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. सध्या याबाबत हितेनशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे करण नैतिकची व्यक्तिरेखा साकारतो की नाही हे काही दिवसांतच कळेल.