Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाण्यापेक्षा त्यातील शब्द महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:59 IST

आज शांताबाई, गढुळाचं पाणी अशी गाणी प्रचंड पसंती मिळवत आहेत, हे मान्य असलं, तरी लोकांनी त्यातील शब्दांकडेही आवर्जून लक्ष ...

आज शांताबाई, गढुळाचं पाणी अशी गाणी प्रचंड पसंती मिळवत आहेत, हे मान्य असलं, तरी लोकांनी त्यातील शब्दांकडेही आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मी स्वत: शास्त्रीय संगीत शिकत असल्याने त्यातून मिळणारा आनंद मला माहीत आहे. पण शांताबाई किंवा गढुळाचं पाणी अशा गाण्यांच्या संगीतापेक्षा त्याच्या शब्दांतून आपल्याला काय बोध होतो हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.कारण आज चांगल्या शब्द देणार्‍या गीतकारांची संख्या खूप कमी आहे. एक काळ असा होता, की जेव्हा गणेशोत्सवात गणपतीचीच गाणी ऐकायला मिळायची, पण आज ते सोडून वेगळीच गाणी ऐकायला मिळतात, जी केवळ डान्स करण्यासाठी लावलेली असतात. त्यामुळे अशा गाण्यांची खरंच गरज असते का, असा प्रश्न इथे उपस्थित करावासा वाटतो. कारण आपली संस्कृ ती जपणारं संगीत जपणं आपल्याच हातात आहे असं मला वाटतं.