Join us

केसगळती, अंगावर लाल पुरळ, टार्गेटेड थेरपीमुळे होतोय भयंकर त्रास! दीपिका हेल्थ अपडेट देत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:54 IST

केसगळती, अंगावर लाल पुरळ अन्... टार्गेटेड थेरपीमुळे दीपिका कक्करला होतोय त्रास, हेल्थ अपडेट देत म्हणाली...

Deepika Kakkar: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड तिच्या कॅन्सरच्या सर्जरीमुळे चर्चेत आहे. गेल्या २ महिन्यांपासून अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत. तिच्या यकृतातून टेनिस बॉलच्या आकाराचे ट्यूमर काढण्यात आले होते. या शस्त्रक्रियेनंतर दीपिका घरी परतली आहे.त्यानंतर अभिनेत्री ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्याद्वारे दीपिका तिच्या आरोग्यासंबंधित प्रत्येक अपडेट देत असते. शिवाय  याचदरम्यान,नव्या ब्लॉगमध्ये दीपिकाने टार्गेटेड थेरपीनंतर तिची तब्ब्येत कशी आहे याबद्दल माहिती दिली आहे.

दीपिका आणि शोएबने त्यांच्या व्लॉगद्वारे चाहत्यांना सांगितले होते की, अभिनेत्रीला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका आहे, ज्यामुळे डॉक्टरांनी तिला दीड वर्षांपर्यंत संपूर्ण कर्करोगाचा उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.  त्यात अलिकडेच तिच्यावर टार्गेडेट थेरपी करण्यात आली आहे. मात्र, ही थेरपी गेल्या महिन्यात सुरू झाली होती आणि त्यानंतर आता त्याचे साईड इफेक्ट्स तिला जाणवत आहेत. थेरपीमुळे अभिनेत्रीचे केस गळत आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर पुरळ उठत आहेत.या आजारामुळे दीपिकाला अल्सरचा त्रास देखील झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहते चिंतेत आहेत.

अलिकडेच शेअर केलेल्या एका ब्लॉगमध्ये दीपिकाने टार्गेटेड थेरपीनंतर तिची प्रकृती कशी आहे, याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. त्याचबरोबर काही ब्लड टेस्ट आणि ईसीजीदेखील केल्याचं तिने म्हटलं. शिवाय औषधे घेतल्यानंतर तिला घाबरल्यासारखं होतं.त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,आता जेव्हा जेव्हा मी याबद्दल डॉक्टरांशी बोलते तेव्हा मलाही तशीच भीती वाटते. अशा परिस्थितीमुळे पुढच्या महिन्यात जेव्हा आपण माझे स्कॅन आणि ट्यूमर मार्कर चाचणी पुन्हा करू तेव्हा काय रिझल्ट येतो, याचंही एक वेगळंच टेन्शन आहे. माझ्या ईएनटी समस्या,माझ्या तळहातावर पुरळ आणि अल्सरचा त्रास  हे सर्व मी घेत असलेल्या टार्गेटेड थेरपीच्या औषधांचे दुष्परिणाम आहेत.जर सूज आणखी वाढली तर मला यावर उपचार करण्यासाठी मला वेगळी औषधे घ्यावी लागतील."

पुढे अभिनेत्रीने सांगितलं," गोळ्यांमुळे माझे केसही गळत आहेत.हा दुष्परिणाम फक्त १० टक्के लोकांमध्ये होतो आणि मी त्यापैकी एक आहे.पण मला तक्रार करायला काहीच नाही कारण औषध घेणे जास्त महत्वाचे आहे. मी प्रार्थना करते की ही औषधं चांगलं काम करतील आणि मला आणखी कोणतीही समस्या उद्भवणार  नाही. सुदैवाने,माझे रक्त रिपोर्ट्सआणि ईसीजी सामान्य आहेत. माझे शरीर या गोळ्या चांगल्या प्रकारे स्वीकारत आहे." असंही अभिनेत्रीने सांगितलं.

टॅग्स :दीपिका कक्करटिव्ही कलाकारकर्करोग