Join us

"ऑनलाईन कॉम्प्रोमाईजही चालेल", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:06 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' भयानक अनुभव

Actress Helly Shah : मनोरंजनविश्वात अनेक वर्षांपासून कास्टिंग काउचची समस्या सतावत आहे.कलाकारांना करिअरच्या सुरुवातीला अशा वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागतं. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचच्या अनुभवांवर भाष्य केलं आहेत. त्यात हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेली शाह (Helly Shah). 

हेली शाहने २०१० मध्ये आलेल्या 'गुलाल' या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. याशिवाय 'स्वरगागिनी', 'इश्क में' या मालिकांमधील तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. परंतु अलिकडच्या काळात ही अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दूर होती. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला एक वाईट अनुभवाविषयी खुलेपणाने भाष्य केलं आहे. त्याबद्दल सांगताना हेली म्हणाली, "एखादा टेलिव्हिजन शो असेल तर ठीक आहे. पण, वेब सीरीजसारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जर असे काही सीन्स असतील ज्यात मी कम्फर्टेबल नसेन ते मी करत नाही. त्यासाठी मी स्पष्टपणे नकार देते. त्यामुळे माझ्या हातून बरेच मोठे प्रोजेक्ट निसटले आहेत. पण हा माझा वैयक्तिक निर्णय आहे."

त्यानंतर अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर करत म्हणाली, "मला एक घटना आठवते. तो एक बिग बजेट प्रोजेक्ट होता. जेव्हा मला त्या प्रोजेक्टसाठी पहिल्यांदा त्यांनी संपर्क केला तेव्हा मी प्रचंड खुश होते. मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही कारण त्याचा त्रास होईल. पण, मी त्याला विचारलं की तुम्ही माझ्याशी संपर्क साधत आहात की फक्त माझ्या नावाचा वापर करताय. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, 'आम्ही फक्त तुमच्याशी संपर्क साधत आहोत. मी म्हणाले ठीक आहे.' पण, मी पाहिलं तर तो एक खूप मोठा मेसेज होता शिवाय एक अट देखील होती. तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. मग मी त्यांना नकार देत म्हटलं कृपया दुसरं कोणीतरी शोधा. मी हे करू शकत नाही."

त्यामुळे मी घाबरले...

"त्यानंतर पुन्हा त्यांचा मेसेज आला की तो फारच धक्कादायक होता. ऑनलाईन कॉम्प्रोमाईज केली तरी चालेल, असं तो म्हणाला. त्यामुळे मी घाबरले. ते नक्का काय घडलं मला समजलंच नाही. त्या घटनेनंतर मी तो नंबर ब्लॉक केला. अशा घटना आपल्यासोबत घडतात. लोक निर्लज्ज असतात. अजूनही अशा प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत, त्याचं वाईट वाटतं. तेव्हा मी तो प्रोजेक्ट नाकारला. " असा खुलासा अभिनेत्रीने केला.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी