Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या नावाचा चुकीचा...", घटस्फोटाच्या अफवांवर प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली- "खूप त्रास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:16 IST

घटस्फोटाच्या अफवांवर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

Aishwarya Sharma : अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. 'बिग बॉस १७' च्या पर्वात सहभागी होऊन या जोडप्याने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं. सध्या त्यांच्या ही लोकप्रिय जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याच्या तुफान चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता या अफवांवर अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहून अभिनेत्री व्यक्त झाली आहे. 

ऐश्वर्या शर्माने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच पती नील आणि ती दोघेही वेगळे होणाच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, "मी आतापर्यंत गप्प होते, याचा अर्थ असा होत नाही की कमजोर आहे, कारण मला शांतता हवी होती. पण, काही लोक माझ्याबाबत ज्या खोट्या गोष्टी पसरवत आहेत, ज्याबद्दल मी कधीही बोलले नाही. शिवाय ज्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, ते खूप त्रासदायक आहे."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "मी हे देखील स्पष्ट करते की, याआधी  मी कोणतीही मुलाखत किंवा कोणत्याही ठिकाणी वक्तव्य केलेलं नाही. माझं आयुष्य जीवन हे तुमचं मनोरंजनाचा भाग नाही, आणि मी शांत आहे म्हणजेच कोणीही वाटेल ते बोलावं याची परवानगी ही मी कोणाला दिलेली नाही. कृपया माझ्या नावाचा चुकीचा वापर करणं बंद कराजर तुमच्याकडे याचे कोणतेही पुरावे किंवा काही ऑडिओ किंवा व्हिडिओ असेल तर तो दाखवा.  तसंच या सगळ्या अफवा पसवरणं बंद करा." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.  

दरम्यान, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांची भेट 'गुम है किसी के प्यार' या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. तिथेच त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केलं.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया