Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मेघा चक्रबोर्तीने गिरवले हिंदीचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 11:14 IST

‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती ही मूळ कोलकात्याची रहिवासी आहे.कोलकात्यातच लहानाची ...

‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती ही मूळ कोलकात्याची रहिवासी आहे.कोलकात्यातच लहानाची मोठी झाल्याने तिला बंगालीपेक्षा अन्य कोणत्याही भाषेत बोलणे अवघड जात असे.आता ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राहणारी तरुणी असल्याने तिला तेथील स्थानिक भाषा आणि तिचे उच्चार येणे भाग होते.तेव्हा मेघाने ती भाषा शिकण्यासाठी चक्क एका हिंदी खडीबोली शिक्षकाची शिकवणी सुरू केली.या अनुभवाविषयी मेघाने सांगितले,“मी आतापर्यंतचं आयुष्य कोलकात्यातच घालविल्याने मला हिंदी भाषा नीट बोलता येत नाही.मला जेव्हा या मालिकेतील भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा मला त्यासाठी उत्तर प्रदेशातील कानपूर भागातील बोली भाषा शिकणे भाग होते.ही भाषा हिंदी भाषेला जवळची आहे. माझे हिंदी उच्चार नीट नसल्याने मी सेटवरच एका हिंदी भाषेच्या शिक्षकाची नियुक्ती केली आणि त्याच्याकडून ही भाषा कशी बोलायची ते शिकले. सुरुवातीला मला ही भाषा शिकणं अवघड गेलं,पण नंतर मी काही आठवड्यांतच ही भाषा व्यवस्थित बोलायला शिकले.” वेगवेळ्या मालिकांमधून विविध भूमिका साकारणारी  ही अभिनेत्री आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून या भूमिकेत ती अगदीच वेगळ्या रूपात दिसणार आहे.‘कृष्णा चली लंडन’ ही कानपूरमधील 21 वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते- ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो.लग्नानंतर अगदी रोमँटिक जीवन जगण्याची त्याची कल्पना असते.तो स्वत: नववी इयत्ता नापास असला आणि त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय व आकांक्षा नसल्या, तरी आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची त्याचा निर्धार असतो.त्याच्या कुटुंबात तो सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका असतो.पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्याला काही स्थान नसते.पण त्याचा निरागस आणि आकर्षक स्वभाव सर्वांचे मन जिंकून घेत असे.त्याला नृत्य करायला फार आवडतं.1990 च्या दशकातील गाण्यांचा तो चाहता असतो.आपल्याला जीवनात सर्व काही मिळाले आहे,अशी त्याची भावना असते- उत्तम कुटुंबीय, उत्तम मित्र, सुखाचे जीवन आणि आता त्याला त्याची पत्नी मिळाली की त्याचे जीवन परिपूर्ण होईल,अशी त्याची समजूत असते.