Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिनाचा वर्कआऊटवेळ सेल्फी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 17:57 IST

गेल्या काही वर्षात फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्या मित्रमैत्रिणींसह फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याची संख्या ...

गेल्या काही वर्षात फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्या मित्रमैत्रिणींसह फोटो काढण्यासोबतच सेल्फी काढण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.सोशल मीडियावर तर सध्या फोटोंपेक्षा सेल्फीची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं.सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीही सेल्फी काढण्यामध्ये मागे नाहीत. किंबहुना सेल्फी काढण्यात सेलिब्रिटी मंडळींमध्ये सेल्फीचा ट्रेंड जास्त आहे असे म्हटल्यास चुकीचेही ठरणार नाही.त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या पाऊट देणं किंवा जिममध्ये वर्कआऊट करण्याचा उत्साह कॅमे-यात क्लिक करणे असो किंवा लग्न समारंभांपासून ते कुटुंबासह सुट्टी सेलिब्रेशन प्रत्येक आनंदाच्या क्षणी फोटोपेक्षा सेल्फी काढण्याचा मोह कलाकारांना अधिक असल्याचे पाहायला मिळते. सध्या हिना खान आपल्या कामाबरोबरच फिटनेसकडेही खूप लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिनाने जिममध्ये वर्कआऊट करतेवेळी क्लिक केलेला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आकर्षक दिसावं आणि सा-यांनी आपलं कौतुक करावं असं सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही वाटतं. त्यामुळे आपल्या फिटनेसचे कौतुक चाहत्यांनीही करावं म्हणूनच की काय सध्या हिना खान आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.तुर्तास तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांकूडन खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारली होती. अक्षरा या भूमिकेमुळे हिना खानला प्रचंड लोकप्रियता मिळाली.मात्र मालिकेत आलेल्या नवीन ट्रॅकमुळे हिना खान साकारत असलेली अक्षरा ही भूमिका काहीशी दुर्लक्षित होत असल्याचे हिनाला वाटत होते. त्यामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेत 'खतरों के खिलाडी 8'व्या पर्वात दमदार एंट्री केली.सध्या या रिअॅलिटी शोमध्ये हिना खानचा एरव्ही कधीही न पाहिलेला बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहयला मिळत आहे.