Join us

नो मेकअप लूकमुळे हिना खान झाली ट्रोल, तर नेटीझन्स म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 13:33 IST

इतर टीव्ही अभिनेत्रींप्रमाणे हीनाही बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.

हीना खानने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून ही अक्षरा बहूत सा-यांचीच पसंती मिळवली होती. त्यानंतर तिने बिग बॉस या शोमध्ये एंट्री केली. तिथे तिचा वेगळाच अंदाज रसिकांना पाहायला मिळाला. त्यानंतर खतरों के खिलाडीमध्येही ती सहभागी झाली होती. आता हीना कामापेक्षा तिच्या विविध अंदाजातील फोटोंमुळेच जास्त चर्चेत असते. हीनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत तिने अजीबात मेकअप केलेला नाही. काहींना तिचा हा विनामेकअप लूक आवडला तर काहींना आवडलेला नाही. त्यामुळे तिच्या या फोटोंवर नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दिल्लीत एका इव्हेंटसाठी हीना गेली होती. एअरपोर्टवर तिला विना मेकअप पाहिले गेले. हीनाला मीडियाच्या कॅमे-यांनी घेरताच तिनेही अशा रितीने पोज वर पोज दिल्या. तसेच मात्र यावेळी कॅमे-यात कैद झालेले फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा मात्र नेटीझन्सने तिला ट्रोल केले. तिचा हा विनामेकअप लूक फारसा आवडलेला नसून काहींनी तर तिला ''मोहल्ले की आंटी'' अशा प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले.   

तसेच इतर टीव्ही अभिनेत्रींप्रमाणे हीनाही बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.  'लाइन्स' या चित्रपटातून ती हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. फिटनेस, सौंदर्य आणि अभिनयामुळे रसिकांची लाडकी अभिनेत्री  आहे.सोशल मीडियावरही तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.

टॅग्स :हिना खान