Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रोलर्सला वैतागून हिना खानने दिली धमकी; म्हटले, अकाउंट डिलीट करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 21:32 IST

बिग बॉसच्या घरात नकारात्मक छबी झाल्यानंतर हिना खान सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता ट्रोलर्स वैतागून तिने थेट धमकी दिली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून लोकप्र्रियता मिळालेली हिना खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. हिनाने गेल्यावर्षी या मालिकेला गुडबाय केला होता. बराच काळ ती या मालिकेशी जुळलेली होती. त्यामुळे तिला या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘बहु’वाली इमेज बदलण्यासाठी तिने ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एंट्री केली. या शोमध्ये तिने बºयापैकी यशही मिळविले. त्यानंतर ती लगेचच सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस-११’ या वादग्रस्त शोमध्ये सहभागी झाली. या शोमध्ये एंट्री करताच हिना खान सातत्याने चर्चेत राहू लागली. त्याचबरोबर तिच्या नावासमोर ड्रामा क्वीन हा टॅगही लागला. कारण ती या शोमध्ये सातत्याने वादाच्या भोवºयात राहिली. त्यातच सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत असल्याने तिची छबी नकारात्मक झाली. विशेष म्हणजे बिग बॉस हा शो संपून आता अडीच महिने होत आहेत, परंतु तरीदेखील ट्रोलर्स कुठल्या ना कुठल्या कारणाने तिच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र आता हिनाची सहनशीलता संपली असून, तिने आपल्या चाहत्यांना वॉर्निंग दिली आहे. त्याचे झाले असे की, हिनाने आपली इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. या व्हिडीओमध्ये हिना लोकांना सांगत आहे की, नकारात्मकता पसरवू नका. जेवढे शक्य आहे तेवढे यापासून बाचव करण्याचा प्रयत्न करा. यावेळी हिनाने हेदेखील सांगितले की, ट्विटरवर विशेषत: नकारात्मकता पसरविणे बंद करा. यावेळी हिनाने वॉर्निंग देताना म्हटले की, अन्यथा मी माझे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करणार.  दरम्यान, बिग बॉस ११ या शोनंतर हिनाला अनेक आॅफर्स येत आहेत. हिनाने बिग बॉसच्या घराबाहेर येताच स्पष्ट केले होते की, आता काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना वेळ देऊ इच्छिते. दरम्यान, हिनाकडे अनेक आॅफर्स आहेत. यामध्ये बॉलिवूड चित्रपटांच्याही तिला आॅफर्स आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, हिना बॉयफ्रेंड रॉकी जायसवाल याच्यासोबत ‘नच बलिए’च्या नवव्या सीजनमध्ये सहभागी होणार आहे.