Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खान पुढील महिन्यापासून करणार 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:20 IST

'कसौटी जिंदगी की 2' मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत अभिनेत्री हिना खान दिसणार आहे.

ठळक मुद्दे'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाकोमोलिकाच्या भूमिकेसाठी हिना खान घेतेय मेहनत

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान स्टाइलिश अभिनेत्री म्हणून प्रचलित आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेनंतर सूनेची इमेज 'बिग बॉस' शोदरम्यान पुसली गेली. या दरम्यान हिनाचे नवीन रुप पाहायला मिळाले. जे प्रेक्षकांना खूप भावले. त्यामुळे कदाचित निर्माती एकता कपूरला 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये कोमोलिकाच्या भूमिकेसाठी हिना योग्य वाटली असेल.

एकता कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'कोमोलिकासाठी माझी एकच पसंती आहे आणि तीच कोमोलिका बनणार.' कोमोलिकाच्या भूमिकेसाठी हिना खानची वर्णी लागली असून या भूमिकेसाठी ती खूप मेहनत घेते आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत पार्थ समाथान व एरिका फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या कोलकातामध्ये सुरू आहे. पण, हिना पुढील महिन्यात चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.हिना खान 'कसौटी जिंदगी की 2'च्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी कुटुंबियासमवेत लंडनला सुट्टी व्यतित करण्यासाठी गेली आहे. याबाबतची माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. या पोस्टमध्ये हिनाने लिहिले आहे की, खान फॅमिली लंडनला जाण्यासाठी रवाना होत आहे. अशाप्रकारे वेकेशनची वाट पाहत होती.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका सोडल्यानंतर हिना 'खतरों के खिलाडी' सीझन 8 मध्ये आणि 'बिग बॉस' सीझन 11मध्ये झळकली होती.'बिग बॉस-11' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही पाहायला मिळाले. या सर्वासाठी कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिना खान गेल्या सिझनमध्ये सर्वाधिक महागडी कंटेस्टंटही ठरली. तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये इतके मानधन मिळायचे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा नवा सीझन प्रेक्षकांना 25 सप्टेंबरपासून शुक्रवारी रात्री आठ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2हिना खान