Join us

बाबा तुम्हाला जाऊन 1 महिना झाला, तुमची खूप आठवण येतेय... वडिलांच्या आठवणींनी हिना खान व्याकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:39 IST

वडिलांच्या आठवणीत हिना खान भावूक झाली आहे.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan)च्या वडिलांच्या निधनाला आता एक महिना उलटून गेला आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला त्यांचे निधन झाले. पुन्हा एकदा ती वडिलांच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने तिच्या वडिलांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ती 1979 मध्ये आलेल्या 'गोलमाल'मधील  'आने वाला पल जाने वाला है (Aane waala pal jaane wala hai)' गुनगुना रहे हैं गुणगुणताना दिसतेय.

व्हिडिओ शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज एक महिना पूर्ण झाला बाबा,  मला तुमची खूप आठवण येते.' यासह हिना खानने एक  दु: खी इमोजी शेअर केले आहे.

हिना खानच्या वडीलांचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले होते. वडिलांच्या निधनावेळी ती श्रीनगरमध्ये होती आणि तिला हे वृत्त कळताच ती मुंबईत परतली होती.  'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतून हिना घराघरांत पोहोचली . तिने सिनेइंडस्ट्रीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडला नव्हता. मात्र तिचे यश पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन दिले, असे हिना नेहमी सांगते. २०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हिना खानने बॉलिवूड चित्रपट हॅक्ड मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

टॅग्स :हिना खान