Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा व्हिडिओ पाहून चाहते भावूक, दिला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:04 IST

वर्कआऊट करुन पावसातच ती छत्री घेऊन घरी येते. हिनाने लिहिले...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या कठीण परिस्थितीला तोंड देत आहे. हिनाने काही दिवसांपूर्वीच  तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला. यानंतर मनोरंजनविश्वातील कलाकार आणि चाहते तिला धीर देत आहेत. त्यातच हिना स्वत:ही खचलेली नसून ती रोज हिंमतीने या आजाराचा सामना करत आहे. नुकताच तिने पावसातला व्हिडिओ शेअर करत भावूक कॅप्शन लिहिलं.

सध्या जीवनात शरिराची काळजी घेण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. याचंच महत्व सांगताना हिनाने व्हिडिओ शेअर केला आहे. वर्कआऊट करुन पावसातच ती छत्री घेऊन घरी येते. हिना लिहिते, 'तुमची काय कारणं आहेत? व्यायाम किंवा शरिराची हालचाल तुमच्या निरोगी आयुष्यासाठी गरजेचं आहे एखाद्या आजाराचा सामना करत असताना तर हे फारच जास्त गरजेचं आहे. रोज व्यायाम केल्याने तुम्हाला केवळ शारिरीकदृष्ट्या स्ट्राँग वाटत नाही मानसिकदृष्ट्याही वाटतं. निरोगी मन ठेवण्यासाठी दुर्लक्ष करुन चालणार नाही."

ती पुढे लिहिते,"किमोथेरपी सुरु असताना मला गंभीर न्युरोपॅथिक कंडिशनचा सामना करावा लागतो ज्यामुळे अनेकदा माझे पाय बधीर होतात. कधीकधी वर्कआऊट करतानाही माझं पायावरचं नियंत्रण सुटतं आणि मी पडते. पण पुन्हा कसं उठायचं याकडे मी जास्त लक्ष देते. पडणं हा माझ्या आयुष्याचा भाग मी होऊ देणार नाही. तर प्रत्येक वेळी पडल्यावर उठून उभं राहणं हे मी दाखवून देईन. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी उठू शकत नाही मला काम करायला जायचं नाही मी स्वत:ला आणखी जास्त पुश करते. कारण माझ्याकडे ताकद, जिद्द आणि इच्छाशक्तीशिवाय काहीच नाहीए. तर व्यायाम न करण्यामागे तुमची काय कारणं आहेत?" 

टॅग्स :हिना खानटेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्तनाचा कर्करोगसोशल मीडिया