Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा मला तुमची आठवण येते पण आता आमच्याकडे फक्त.." वडिलांच्या आठवणीत हिना खान झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 13:30 IST

हिना खानच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीचं निधन झाले आहे.

अभिनेत्री हिना खान  (Hina Khan) वडील अस्लम खान यांच्या निधनाच्या दु:खातून अद्याप सावरलेली नाही. हिनाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीचं निधन झाले होते. काही दिवसांपासून तिने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवले होते.  तिची टीम सोशल मीडिया हँडल करते आहे आणि तिच्या नव्या प्रोजेक्टचीी माहिती देतेय. आता हिना खान (Hina Khan Father)ला तिच्या वडिलांची आठवण येतेय आणि तिने आपल्या वडिलांसोबतच्या सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हिना तिच्या कुटुंबासोबत खूप दिसतेय. 

हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या वडिलांची अनेक फोटो  शेअर केले आहेत. हिनाने  फोटो शेअर करत लिहिलं, मला तुमची आठवण येते.  ​'प्रत्येक क्षणाचं फोटोत क्लिक करायला तुम्हाला किती आवडायचं. आता आमच्याकडे फक्त हेच उरले आहे.'

हिना खानच्या वडीलांचे  कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले होते. वडिलांच्या निधनावेळी ती श्रीनगरमध्ये होती आणि तिला हे वृत्त कळताच ती मुंबईत परतली होती. तिने तिच्या कठीण काळात तिची आणि तिच्या कुटुंबाची साथ दिली त्या सर्व लोकांचे आभार मानले होते.

हिना खान वडिलांच्या खूप क्लोज होती. ती नेहमी इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. 'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतून हिना घराघरांत पोहोचली . तिने सिनेइंडस्ट्रीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडला नव्हता. मात्र तिचे यश पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन दिले, असे हिना नेहमी सांगते.

टॅग्स :हिना खान