Join us

हिना खानने दाखवले अॅब्स,तर नेटीझन्सने दिल्या अशा कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 08:00 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस सिझन 11मध्ये हिना खानला सर्वाधिक महागडी कंटेस्टंटही ठरली. तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये इतके मानधन मिळायचे. 

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरांमध्ये पोहचलेली हिना खान आता फिटनेस फ्रिक अभिनेत्री बनली आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत ती आधी फोटोशूट करताना दिसली तर आता चक्क फिटनेसचे व्हिडीओ करत चाहत्यांसह शेअर करत असते. हिना खानने नुकताच आपला एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती फिटनेस टीप्स देताना दिसत आहे.हिनाची फिटनेस बॉडी पाहून खुद्द कतरिना कैफनेही तिची स्तुती केली होती. वर्कआऊट करत हिनाने चक्क 7 किलो वजन कमी केले आहे. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात त्याच यादीत आता हिनाचे नाव गणले जात आहे.सध्या  आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.आपल्या व्हिडीओतून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे असेच तिचे म्हणणे आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है मालिका सोडल्यानंतर हिना खतरों के खिलाडी सिझन 8 मध्ये आणि बिग बॉस सिझन 11मध्ये झळकली होती.'बिग बॉस-11' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही पाहायला मिळाले. या सर्वासाठी कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिना खान गेल्या सिझनमध्ये सर्वाधिक महागडी कंटेस्टंटही ठरली. तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये इतके मानधन मिळायचे. 

काही दिवसांपासून हिना टीव्हीपासून दूर आहे. अशी चर्चा आहे की,हिना बॉयफ्रेन्ड रॉकीसोबत 'नच बलिए'मध्ये डान्स करताना दिसणार आहे. तर एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मालिके कोमोलिकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. शिल्पा शिंदेने भलेही बिग बॉस ११ जिंकलं असेल पण हिना खान सर्वात जास्त लोकप्रिय ठरली. हिनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून हिना पूर्णपणे बदलली आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक आणि अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. 

टॅग्स :हिना खान