Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खान या गोष्टीमुळे झाली इमोशनल, अश्रूही झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:11 IST

‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत कोमोलिका या खलनायिकेची भूमिका अतिशय वास्तववादी पद्धतीने साकारल्यामुळे अभिनेत्री हिना खानची सगळीकडे खूप कौतूक झाले.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत कोमोलिका या खलनायिकेची भूमिका अतिशय वास्तववादी पद्धतीने साकारल्यामुळे अभिनेत्री हिना खानची सगळीकडे खूप कौतूक झाले. पण आता तिला तिच्या इतर प्रोजेक्टमुळे ही मालिका सोडावी लागत आहे. परिणामी मालिकेतील कोमोलिकाची व्यक्तिरेखाही मालिकेतून बाद होताना दिसेल. या व्यक्तिरेखेच्या चित्रीकरणाच्या अखेरच्या दिवशी मालिकेचे कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी हिना खानला निरोप दिला आणि त्यांचा निरोप घेताना हिना खानही भावनावश झाली.

या मालिकेशी संबंधित सूत्रांनी सांगितले, “हिना खानचा चित्रीकरणाचा अखेरचा दिवस हा सेटवरील सर्वांसाठी काहीसा भावनिक दिवस होता. हिना खान ही या मालिकेचा अविभाज्य भाग बनली होती आणि मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचाऱ्यांशी तिने उत्तम संबंध जोडले होते. त्यामुळे या सर्वांनी तिचा अखेरचा दिवस संस्मरणीय करण्याचा निर्णय घेऊन तिला एक सरप्राईज निरोपाची पार्टी दिली.

यावेळी त्यांनी सेटवर केक कापला आणि मालिकेतील तिच्या काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वांचा निरोप घेताना हिना खानचेही डोळे भरून आले आणि आपल्याला या सर्वांची नेहमीच आठवण येत राहील,” असे ती म्हणाली.

हिना खानने ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत कोमोलिका या खलनायिकेची भूमिका साकारताना सर्वांच्या मनावर आपला ठसा उमटविला होता.

या मालिकेतील एका ग्लॅमरस खलनायिकेला प्रेक्षकांना मुकावे लागणार असले, तरी आणखी एका अशाच अविस्मरणीय मि. बजाज या व्यक्तिरेखेचा लवकरच मालिकेत प्रवेश होणार आहे.

टॅग्स :हिना खानकसौटी जिंदगी की 2