टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे हे सर्वांनाच माहित आहे. या कठीण प्रसंगातही ती शक्य तितकं सकारात्मक राहत आहे. तसंच ती सतत सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. किमोथेरपीतून जात असताना होत असलेला त्रासही ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त करते. इतकंच नाही तर हिना जमेल तितकं कामही करत आहे. अशातच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आलाय, जो चर्चेत आहे.
हिना खानचा एक व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत दिसतेय. हा व्हिडीओ पाहून दोघे लग्न करताय का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खरंतर हा व्हिडीओ 'सेलिब्रिटी शेफ्स'च्या सेटवरील आहे. जिथे हिना खान तिच्या बॉयफ्रेंडसह पोहोचली होती. तिथं तिचं भव्य स्वागत करण्यात आलं. व्हिडीओमध्ये हिना खान पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अगदी सुंदर दिसतेय. तर रॉकी पांढऱ्या शेरवानीमध्ये पाहायला मिळतोय. 'सेलिब्रिटी शेफ'चे स्पर्धक त्यांच्या स्वागतात नाचताना दिसून येत आहे.
दरम्यान, हिना लवकरच तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. हिना आणि रॉकी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. रॉकी हिनाच्या कठीण काळात प्रत्येक क्षणी तिच्या पाठीशी उभा राहिलाय. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट शेअर करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं.