Join us

​हिना खान आणि करण मेहरावर केले ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या निर्मात्याने हे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 16:49 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने आणि नैतिकच्या भूमिकेत असलेल्या करण मेहराने काही ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने आणि नैतिकच्या भूमिकेत असलेल्या करण मेहराने काही दिवसांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला. मालिकेतील प्रमुख कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टीआरपी ढासळेल असे सगळ्यांना वाटत असतानाच या मालिकेचा टिआरपी आजही टिकून आहे.करण मेहराने तब्येतीच्या कारणावरून ही मालिका सोडली होती. पण काहीच दिवसांत तो बिग बॉस या कार्यक्रमात दिसला. त्याच्यानंतर काहीच दिवसांत हिना खाननेदेखील ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रमुख कलाकारांनी मालिका सोडणे हे टीआरपीच्या दृष्टीने नेहमीच धोकादायक मानले जाते. पण या दोघांनी मालिका सोडूनही मालिकेच्या टीआरपीत काहीच फरक पडला नाही. उलट टीआरपी त्यांच्या एक्झिटनंतर अधिक वाढला असे ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे निर्माते राजन साही यांचे म्हणणे आहे. त्यांनी नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे. त्यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते सांगतात, "हिना आणि करणची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे दोघांचे अजिबातच पटत नव्हते. त्या दोघांसोबत मालिकेचे चित्रीकरण करणे कठीण जात होते. ते कधी कधी सेटवरून दोन-तीन तास आधीच निघून जायचे. त्या दोघांनी मालिका सोडल्यानंतर मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढला आहे."निर्मात्यांच्या या विधानाबद्दल हिना सांगते, "मला कोणत्याही बाबतीत काहीही बोलायची इच्छा नाहीये. मला आरोप-प्रत्यारोपामध्ये पडायचेच नाहीये." तर करणचे म्हणणे आहे की, "मी दोन-तीस तास सेट सोडून जायचो असे निर्मात्यांचे म्हणणे असल्यास त्यांनी याबाबत पुरावा द्यावा. पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलण्यात काय अर्थ आहे."