Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिमेश रेशमिया सांगतोय रिअॅलिटी शोमुळेच मिळते नव्या टायलेंटला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:59 IST

प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला हिमेश रेशमियाने संगीत दिले होते. या चित्रपटाची सगळीच गाणी हिट झाल्यामुळे हिमेश ...

प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला हिमेश रेशमियाने संगीत दिले होते. या चित्रपटाची सगळीच गाणी हिट झाल्यामुळे हिमेश त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याने संगीत दिलेल्या तेरे नाम या या चित्रपटातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली. तेरा सुरूर हे त्याने गायलेले गाणे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आज एक अभिनेता, गायक, संगीतकार अशी त्याने त्याची ओळख बनवली आहे. सध्या तो सारेगमपा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. त्याच्या परीक्षणाच्या अनुभवाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा...हिमेश गाणे गाणे अथवा गाण्याला संगीत देणे आणि गाण्याचे परीक्षण करणे यात काय फरक असल्याचे तुला जाणवते?गाणे गाणे हे खरे तर आव्हानात्मक असते. पण आतापर्यंत मी गायलेल्या सगळ्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. गाणे गात असताना ते प्लॉप होईल का हिट होईल हे तुम्हाला माहीत नसते. हे सर्वस्वी रसिकांवर अवलंबून असते. प्रेक्षकांनी आजवर दिलेल्या प्रेमामुळे माझी सगळी गाणी सुपरहिट झाली आहेत. पण तुम्ही ज्यावेळी परीक्षकाच्या खुर्चीत बसता त्यावेळी स्पर्धकासोबत योग्य न्याय झाला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. कोणासोबतही चुकीचा न्याय होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो.तू आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली आहेस, लहान मुलांच्या गायकीचे परीक्षण करणे हे कितपत कठीण आहे असे तुला वाटते?वयाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांना प्रतिक्रिया देताना तितकासा विचार करावा लागत नाही. पण लहान मुलांना प्रतिक्रिया देताना दहा वेळा विचार करावा लागतो. लहान मुले लगेचच कोणतीही गोष्ट मनाला लावून घेतात. त्यामुळे त्यांना अतिशय प्रेमाने समजवावे लागते. खरे तर सगळीच लहान मुले खूप छान गातात. त्यामुळे कोणाची निवड करायची हा प्रश्न उभा राहतो.रिअॅलिटी शोचा स्पर्धकांना फायदा होतो असे तुला वाटते का?रिअॅलिटी शो हा स्पर्धकांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देतो. अनेकवेळा स्पर्धकांची गाणी ऐकून त्यांना चित्रपटाच्या ऑफर्सदेखील मिळतात. मी स्वतः अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. मी त्या कार्यक्रमातील अनेक स्पर्धकांना मी संगीत देत असलेल्या चित्रपटांमध्ये संधी दिली आहे आणि त्यांच्यातील अनेकांची गाणी हिटदेखील झाली आहेत. त्यामुळे रिअॅलिटी शो हे खूप महत्त्वाचे असतात असे मला वाटते. माझ्या कारकिर्दीत मला सलमान खान यांनी ब्रेक दिल्यामुळे आजवर मी ही प्रगती करू शकलो आहे. त्यामुळे मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. त्यांनी मला ज्याप्रकारे ब्रेक दिला, त्याप्रमाणे मी नव्या टायलेंटला संधी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अनेक नवीन टायलेंट मला पाहायला मिळतात. खूप लहान वयात मुलांनी नृत्य अथवा गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये अशी दरम्यानच्या काळात चर्चा सुरू होती, यावर तुझे काय म्हणणे आहे?लहान मुलांनी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलाच पाहिजे असे मला वाटते. कारण हेच त्यांच्यासाठी योग्य वय आहे. याच वयात त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याची ते निवड करू शकतात आणि अनेकांचा आवाज या वयातच डेव्हलप होत असतो. त्यामुळे आवाज डेव्हलप होत असतानाच त्यांना या कार्यक्रमामुळे अनेक दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते. मीदेखील केवळ 14व्या वर्षापासून या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. मी सुरुवातीला अंदाज, अमर प्रेम यांसारख्या मालिकांच्या टायटल साँगवर काम केले होते.