Join us

​हा पाहा, कपिलच्या नव्या शोचा सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 16:33 IST

कॉमेडी नाइट्स विद कपिल’द्वारे प्रेक्षकांचे अखंड मनोरंजन केल्यानंतर कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्मा ‘दी कपिल शर्मा शो’ हा सर्वांर्थाने नवा ...

कॉमेडी नाइट्स विद कपिल’द्वारे प्रेक्षकांचे अखंड मनोरंजन केल्यानंतर कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्मा ‘दी कपिल शर्मा शो’ हा सर्वांर्थाने नवा शो घेऊन येतो आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. हा शो नव्या थीमवर आधारित असेल, हेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये कपिलचे घर दाखवले होते. पण ‘दी कपिल शर्मा शो’मध्ये कपिलची गल्ली असणार आहे. या गल्लीत घडणाºया गमती-जमती, विनोद अशी या शोची थीम आहे. कपिलच्या या नव्या शोची लोक प्रचंड उत्सूकतेसह प्रतीक्षा करीत आहे. आज बुधवारी कपिलने आपल्या नव्या शोच्या सेटचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. येत्या २३ एप्रिलपासून हा शो सुरू होत आहे. तेव्हा बघा तर, कसा असेल ‘दी कपिल शर्मा शो’चा नवा सेट...