मुलांसह असा साजरा केला उर्वशी ढोलकीयाने तिचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 14:14 IST
टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाने नुकताच तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.तिचे मित्र आणि कुटुंबियासोबत तिने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.खुद्द उर्वशीने तिचे हे ...
मुलांसह असा साजरा केला उर्वशी ढोलकीयाने तिचा वाढदिवस
टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाने नुकताच तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.तिचे मित्र आणि कुटुंबियासोबत तिने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.खुद्द उर्वशीने तिचे हे बर्थ डे चे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.एका फोटोत ती केक कटींग करताना दिसतेय,तर दुस-या फोटोत मुलांसोबत एन्जॉय करताना दिसतेय.खास मॉम उर्वशीसाठी मुलांनी सरप्राईज बर्थ डे पार्टीचेही आयोजन केले होते.या पार्टीत तिचे मित्रमंडळीसह तिचे कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. उर्वशीने वयाची 38 वर्ष पूर्ण केली आहेत.उर्वशीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.फोटोमध्ये उर्वशीचा लूकही खूप ग्लॅमरस दिसतोय.शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत असल्याच्या प्रतिक्रीया तिचे चाहते देताना दिसतायेत. सध्या उर्वशी एकता कपूरची 'चंद्रकांता' मालिकेत झळकत आहे. उर्वशी मालिकेत रानी इरावती नावाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली असून तलवारबाजीपासून ते घोडेस्वारीचे तिने रितसर प्रशिक्षणही घेतले होते.तसेच उर्वशीने 'बिग बॉस 6' सिझनचे विजेतेपद मिळवल्यानंतर 'बडी दू से आये है' या मालिकेत झळकली होती.तसेच उर्वशीने आधी बालाजी प्रोडक्शनच्याच 'कसौटी जिंदगी की 'या मालिकेत 'कोमोलिका' ही नेगेटीव्ह भूमिका रंगवली होती. याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती.नुकतेच उर्वशीने सागर आणि श्रितिज दोन्ही मुलांचा 22 वा बर्थ डे सेलिब्रेट केला होता.तिच्या दोन्ही मुलांना अभिनयातही रस आहे. त्यामुळे उर्वशी प्रमाणे तिचा लेक सागरही सिनेमा किंवा मालिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे.