Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वैभवीच्या अंत्यसंस्कारावेळी आईची झाली वाईट अवस्था, लेकीचा मृतदेह पाहून वडिलही कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 15:31 IST

'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी वैभवीला मुंबईत अखेरचा निरोप दिला. वैभवी उपाध्यायच्या अंत्यसंस्काराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. रडून रडून वैभवीच्या आई-वडिलांची अवस्था कशी बिकट झाली हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच वैभवी हे जग सोडून गेली. 'साराभाई व्हर्सेस साराभाई'चे अनेक स्टार्सही अभिनेत्रीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.

वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार २४ मे २०२३ रोजी बोरवलीत पार पडले. यावेळी तिचे कुटुंबीय, मित्र आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारही उपस्थित होतो. वैभवीच्या शेवटच्या क्षणी तिचा भाऊ अंकित, आई आणि वडील ढसाढसा रडताना दिसले. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचीही मनेही हेलावून गेली आहेत. 

वैभवी उपाध्यायचा भाऊ अंकित उपाध्याय सर्वात भावूक दिसला. अंकित आणि त्याची आई आपल्या बहिणीच्या आठवणीने रडताना दिसत आहेत. वैभवी अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या भावंड आणि पालकांसोबतचे फोटो शेअर करत होती. यासोबतच वैभवीचा मंगेतर जय गांधीही दिसत आहे. कुटुंबाशिवाय टीव्हीच्या अनेक बड्या स्टार्सनी वैभवीला निरोप दिला. अभिनेता गौतम रोडे, जेडी मजीधिया, सुमीत राघवन आणि देवेन भोजानी यावेळी उपस्थित होते.

वैभवी उपाध्याय यांचा मृत्यू कसा झालाअभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन झाले. २२ मे २०२३ रोजी आपल्या फियॉन्सेसोबत हिमाचलला सहलीसाठी गेलेल्या वैभवीच्या कारचे नियंत्रण सुटले. तिने सीट बेल्ट घातलेला नव्हता. अभिनेत्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच तिला जागीच हृदयविकाराचा झटका आला आणि यात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.