Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल दोस्ती दुनियादारीचा शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 04:44 IST

तरूणांसाठी दु:खाची बातमी आहे, कारण तरूणांची फेव्हरेट मालिका दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचा आज शेवट होणार आहे. या मालिकेतील ...

तरूणांसाठी दु:खाची बातमी आहे, कारण तरूणांची फेव्हरेट मालिका दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचा आज शेवट होणार आहे. या मालिकेतील कैवल्यची मस्ती, अ‍ॅनाचा वेडेपणा, सुजयचा हुशारीपणा, मीनूची दादागिरी, आशुचे भन्नाट जोग तर रेश्माने बनविलेले पदार्थ पुन्हा पाहायला मिळणार नाही. ही आॅन स्क्रीन दोस्तीची धमाल पुन्हा एॅन्जॉय करायला मिळणार नाही.तसेच या मालिकेची सुरूवात व शेवट एकाच पद्धतीने झालेला दिसणार आहे. म्हणजेच या मालिकेचेची सुरूवात ट्रेनने झाली होती. आणि शेवट देखील  ट्रेननेच होणार आहे. पण ,या शेवटच्या ट्रेनच्या प्रवासात रेश्मा नसल्यामुळे हे माजघरातले मित्रमंडळी एपिसोडच्या शेवटी थोडी दु:खी झालेले दिसणार आहे.तसेच  या मैत्रिचा प्रवास.आठवणी, मस्ती, भावना या मित्रांनी टिविटरवर शेअर केलेले आहे.