Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे मन बावरे मधील या अभिनेत्रीचे नुकतेच झाले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 17:53 IST

He Mann Baware Serial : सायली परबनेच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

ठळक मुद्देहे मन बावरे या मालिकेत नेहाच्या भूमिकेत असलेल्या सायली परबचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव इंद्रनील शेलार आहे.

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. याच मालिकेतील एका अभिनेत्रीचे नुकतेच लग्न झाले असून तिने सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. 

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत नेहाच्या भूमिकेत असलेल्या सायली परबचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव इंद्रनील शेलार आहे. डिसेंबरमध्ये सायली आणि इंद्रनीलने साखरपुडा केला होता. आता ते दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. 1 फेब्रुवारीला धुमधडाक्यात त्यांनी लग्न केले. इंद्रनील हा फोटोग्राफर असून सायलीच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

सायलीने 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेआधी झी वाहिनीवरील चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकेत काम केले होते. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेतील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तिने मालिकांमध्ये काम करण्याआधी काही नाटकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच हुतात्मा या वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे. 

सायली आणि इंद्रनील या दोघांचेही बालपण डोंबिवलीत गेले असून त्या दोघांची जोडी खूपच छान दिसत असल्याचे सायलीचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे तिला सांगत आहेत. 

टॅग्स :हे मन बावरे