Join us
Daily Top 2Weekly Top 5

सागर कारंडेच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, पत्नी आहे दिसायला खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 07:00 IST

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं ते जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते.

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील विनोदवीर सागर कारंडेच्या कुटुंबाविषयी सांगणार आहोत..

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे की, प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

सागर सोशल मीडियावर अनेकवेळा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. सागरच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि मुलगी आहे. सागर अनेकवेळेला आपल्या पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. 

दरम्यान सागरचं सध्या रंगभूमीवर हीच तर फॅमिली ची गंमत आहे हे नाटकं सुरु आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार