Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'चा प्रोमो समोर; नेटकरी म्हणाले, "यासाठी चला हवा येऊ द्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 09:32 IST

निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'चा प्रोमो पाहून नेटकरी नाराज, म्हणाले...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'चला हवा येऊ द्या','फू बाई फू' हे टीव्हीवरील कॉमेडी शो प्रचंड गाजले. या कॉमेडी शोने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता आणखी एक नवा कोरा कॉमेडी शो प्रेक्षकांना खळखळवून हसवायला येत आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' असं या कॉमेडी शोचं नाव असून यातून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या कॉमेडी शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर आता निलेश साबळे आणि भाऊ कदमकलर्स मराठीच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धी मिळवलेला ओंकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या नव्या कोऱ्या कॉमेडी शोचा पहिला प्रोमो समोर आला आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने दिसत आहेत. कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नव्या कॉमेडी शोचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. 

"यासाठी चला हवा येऊ द्या बंद पडली", "कोणताच नवीन कार्यक्रम आणि चॅनेल चला हवा येऊ द्या आणि झी मराठीला रिप्लेस करू शकत नाही", "चला हवा येऊ द्यासाठी अजून वाट पाहणार", "चला हवा येऊ द्या हे इमोशन आहे", अशा कमेंट करत चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी कमेंट करत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची मागणी केली आहे. काही चाहत्यांनी निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकारला एकत्र पाहताना मज्जा येणार असल्याचं म्हटलं आहे.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा कॉमेडी शो २० एप्रिलपासून शनि-रवि रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. या निमित्ताने निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे हास्याचं त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :निलेश साबळेभाऊ कदमकलर्स मराठी