Join us

म्हातारपणात कोण असणार आधार? हर्षदा खानविलकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:04 IST

हर्षदा खानविलकर यांचा म्हतारपणीचा आधार कोण? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या...

Harshada Khanvilkar Emotional Revelation: गेली कित्येक वर्षे अभिनेत्री हर्षदा खानविलकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. 'पुढचं पाऊल'मधील अक्कासाहेब असो किंवा 'रंग माझा वेगळा'मधली सौंदर्या असो हर्षदा यांनी नेहमीच भारदस्तच भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा आवाज, जरब, स्टाईल या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडलेल्या. हर्षदा खानविलकर यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. टीव्हीवरील कणखर भूमिकांसाठी  ओळखल्या जाणाऱ्या हर्षदा खानविलकर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात वडिलांच्या आठवणीने भावुक झाल्या. हर्षदा खानविलकर यांच्यासाठी त्यांचे वडील सर्वस्व होते. पण, ते गेल्यावर त्यांच्या आयुष्यात खूप एकटेपणा आला. त्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. याच कार्यक्रमात हर्षदा यांनी म्हातारपणात कोण त्याचा आधार असणार आहे, याबद्दल सांगितलं. 

हर्षदा खानविलकर या सध्या झी मराठीवरील 'लक्ष्मी निवासी' मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. अलीकडेच झी मराठीतर्फे आयोजित 'उत्सव नात्यांचा' पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात हर्षदा खानविलकर यांचा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी हर्षदा यांना सरप्राइज म्हणून त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी बहीण अर्चना यांना रंगमंचावर बोलवण्यात आलं. यावेळी अर्चना यांच्यावरचं प्रेम व्यक्त करताना हर्षदा भावूक झाल्या. 

हर्षदा म्हणाल्या, "ही माझी धाकटी बहीण आहे. आम्ही लहान असताना हरभरे संबंध नव्हते आमचे. पण जस जशी वेळ पुढे गेली तसं आम्ही आमच्या आयुष्यातला खूप मोठं दुःख पचवलं ते म्हणजे आमचे वडील गेले... त्यानंतर मला कुठेतरी जाणवलं की मी आणि अर्चना एकमेकांवर खूप डिपेंडंट आहोत. आणि आता ती माझ्यासाठी बहीण आहे, लेक आहे, कधीकधी आई सुद्धा आहे. आणि आता ती माझी बेस्ट फ्रेंड झाली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे तिने माझ्या आयुष्यातला खूप अनमोल गिफ्ट मला दिला आहे ते म्हणजे तिचा मुलगा. कुशल... ज्याला मी माझ्या बुढापे का सहारा म्हणते. कदाचित असा गिफ्ट मला कधीच कोणी देऊ शकणार नाही". अर्थात हर्षदा या त्यांच्या बहिणीच्या मुलालाच आपला मुलगा मानतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Who will be the support in old age? Harshada reveals.

Web Summary : Actress Harshada Khanvilkar, reminiscing about her father and the loneliness after his passing, shared that her sister's son, Kushal, is her support system for old age, considering him an invaluable gift.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीमराठी अभिनेता