Join us

हर्ष छाया झळकणार जिंदगी की महेक या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 15:22 IST

हसरते, अस्तित्व...एक प्रेम कहानी यांसारख्या मालिकांमुळे नावारूपाला आलेला अभिनेता हर्ष छाया लवकरच जिंदकी की महेक या मालिकेत झळकणार आहे. ...

हसरते, अस्तित्व...एक प्रेम कहानी यांसारख्या मालिकांमुळे नावारूपाला आलेला अभिनेता हर्ष छाया लवकरच जिंदकी की महेक या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्याची मालिकेत एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. हर्ष छाया या मालिकेत साकारत असलेली भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या मालिकेत तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे. हर्ष अजिब दास्ताँ है ये, तमन्ना, 24 यांसारख्या मालिकांमध्ये नुकताच झळकला होता. त्याच्या या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हर्ष जिंदगी की महेक या मालिकेत शौर्यच्या म्हणजेच करण वोराच्या काकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका काहीशी भूमिकेला ग्रे शेड्सची आहे. हर्ष या मालिकेत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. त्याच्या या नव्या मालिकेविषयी तो सांगतो, "मी लवकरच जिंदगी की महेक या मालिकेचा भाग होणार आहे. पण मी अद्याप या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली नसल्याने मी तुम्हाला माझ्या भूमिकेविषयी काही सांगू शकत नाही." जिंदगी की महेक या मालिकेत नुकतीच प्रेक्षकांना आशू कोहलीची एंट्री पाहायला मिळाली होती. आशू गेल्या अनेक वर्षं इंडस्ट्रीत असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाहिरात उद्योगातील एक मोठे नाव म्हणून आशूकडे पाहिले जाते. आतापर्यंत हजारहून अधिक प्रिंट जाहिरातींमध्ये तो झळकला आहे. आशूनंतर आता हर्ष प्रेक्षकांना एक प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.