Join us

‘खतरों के खिलाडी ९’मधून हर्ष लिंबायचिया बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 14:58 IST

विकास गुप्ता बाहेर पडल्यानंतर आता हर्ष लिंबाचिया देखील शोमधून बाहेर पडला आहे.

ठळक मुद्दे'खतरों के खिलाडी'च्या ९व्या सीझनची शूटिंग अर्जेंटिनामध्ये सुरू

छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी -९’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो सध्या एका रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना ऐनवेळी या शोमधून विकास गुप्ताला बाहेर पडावे लागले होते. विकासच्या बाहेर पडण्यानंतर आता हर्ष लिंबाचिया हा देखील शोमधून बाहेर पडला आहे.

‘पिंकव्हिला’च्या रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी’ हा साहसदृश्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम असून यात स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देण्यात येत असतात. सध्या या शोच्या ९ व्या पर्वाचे चित्रीकरण अर्जेंटीनामध्ये सुरु असून विकासनंतर नुकताच हर्ष बाहेर पडला आहे. अंतिम फेरीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यास हर्ष असमर्थ ठरल्यामुळे त्याला हा शो सोडावा लागला आहे.

विकास आणि हर्ष या दोघांकडेही विजेतापदाचा दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे विकासला हा शो सोडावा लागला तर हर्षला शोमध्ये टिकणे अशक्य झाले. मात्र हे दोघे जरी शोमधून बाहेर पडले असले तरी भारती सिंगकडे विजेतीपदाची दावेदार म्हणून पाहिले जात आहे. सध्या या शोमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्रीच्या माध्यमातून दोन स्पर्धकांचा प्रवेश होणार असून एली आणि आदित्य नारायण पुन्हा या शोमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. . 'खतरों के खिलाडी'मध्ये अविका गौर, भारती, पुनीत, स्मिता शेट्टी, अविका गौर या कलाकारांचा समावेश आहे. आगामी काळात या शोमध्ये कोण स्पर्धक बाहेर पडते व कोणाची आत एन्ट्री होते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.