Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्ष आणि पुनित यांनी 'खतरा खतरा खतरा'च्या सेटवर पपी अॅक्ट केला सादर, असे केले फॅन्सने कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:29 IST

विशेष म्हणजे हा डान्स पाहिल्यानंतर त्यांना कशाप्रकारे कमेंटस मिळतील याची भीती हर्षला होती. मात्र हा डान्स सा-यांनाच खूप आवडला.

कोरियोग्राफर सोबत किंवा त्याच्या विरुध्द डान्स करणे सोपे नसते, हर्ष लिंबाचियाला अशाच आव्हानाला सामोरे जावे लागले. खतरा खतरा खतराच्या सेटवर पुनित आणि हर्षने एक एपिक डान्स सादर केला, त्यातील गंमतीदार गोष्ट ही होती की त्या दोघांनी फक्त हातापायांचा वापर करत डान्स सादर  केला. रसिकांचे मनोरंजन व्हावे यासाठीच हा विक्षिप्त डान्स त्यांनी सादर केला. विशेष म्हणजे हा डान्स पाहिल्यानंतर त्यांना कशाप्रकारे कमेंटस मिळतील याची भीती हर्षला होती. मात्र हा डान्स सा-यांनाच खूप आवडला. हा डान्स पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी खूप चांगल्या कमेंटस देत त्यांचे कौतुकच केल्याचे पाहायला मिळाले. 

 खरंतर शोमध्ये भारती सिंग नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असते. त्यामुळे या वेळी हर्षलाही अशाच प्रकारे परफॉर्मन्समध्ये वेगळेपण आणायचे होते.त्यानुसार पुनित आणि हर्षने परफॉर्मन्स सादर केला. आता भारतीने हर्ष आणि पुनितला 'काला चश्मा' गाण्यावरही परफॉर्म करण्याचे आव्हान दिले आहे. 'खतरों के खिलाडीचा 9' वा सीझन जिंकल्या नंतर पुनीत या शोमध्ये सहभागी झाला आहे.आगामी भागात पुनीत पाठक कॉमेडियन आणि प्रँकस्टरची भूमिका करताना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

टॅग्स :पुनित पाठकभारती सिंग