Join us

हरपाल करणार नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:08 IST

झलक दिखला दा हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आपले नृत्य प्रेक्षकांसमोर सादर करत ...

झलक दिखला दा हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आपले नृत्य प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. शेफ संजीव कुमार आपल्याला याआधीच्या सिझनमध्ये नाचताना दिसला होता. यावेळेच्या सिझनमध्येही एक शेफ झळकणार असल्याची चर्चा आहे. पदार्थाची पाककृती दाखवताना, मीठ टाकताना नमक शमक असे म्हणणारा शेफ हरपाल सिंग सोखी चांगलाच प्रसिद्ध आहे. तो झलक दिखला जा या कार्यक्रमात नाचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असे म्हटले जात आहे. हरपालची पाककृती सांगण्याची पद्धत लोकांना खूप आवडते. त्यामुळे तो लोकांचा लाडका आहे.