Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षयाच्या सासूबाईंना पाहिलंत का? पाठकबाईंनी शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:03 IST

हार्दिक जोशीच्या आईचा आज वाढिदवस आहे. यानिमित्ताने अक्षयाने तिच्या सासूबाईंबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी ‘तुझ्यात जीव रंगला’ एक आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रचंड गाजली. अभिनेता हार्दिक जोशीने राणादा तर अभिनेत्री अक्षया देवधरने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षया आणि हार्दिकने डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

अक्षयाच्या सासूबाई म्हणजेच हार्दिकच्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर केली आहे. तर अक्षयाने लाडक्या सासूबाईंबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हार्दिकच्या आईबरोबरचे गोड फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोला तिने “हॅपी बर्थडे मम्मी”, असं कॅप्शन दिलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘सासूबाई’ असं म्हटलं आहे.

“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

हार्दिकने आईच्या सांगण्यावरुनच अक्षयाला प्रपोज केल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. अक्षया आपल्या घरची सून व्हावी, अशी हार्दिकच्या आईची इच्छा होती. राणादा आणि पाठकबाईंनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्यामुळे त्यांचे चाहतेही प्रचंड खुश होते.  

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीमराठी अभिनेता