Join us

गावच्या मातीत पुन्हा रमणार हार्दिक जोशी; झळकणार 'या' नव्या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:21 IST

Hardeek joshi: हार्दिक आता पुन्हा एकदा त्यांच्या रांगड्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे

'तुझ्यात जीव रंगला' (tuzyat jeev rangala) या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी (hardeek joshi) उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर हार्दिकने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे हार्दिक आता पुन्हा एकदा त्यांच्या रांगड्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. झी मराठीवर सुरु होणाऱ्या एका नव्या कार्यक्रमात हार्दिक झळकणार असून या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.

छोट्या पडद्यावर लवकरच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा नवा रिअॅलिटी गेम शो सुरु होणार आहे. अलिकडेच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला असून तो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एक शहरात राहणारी तरुणी गावात गेली असून तिथलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. यात ती शेण सारवताना दिसते. तिचा हा प्रयत्न पाहून  "शेणानं घर सारवणं, नेलपॉलिश लावण्याइतकं सोप्पं नसतं!" , असं मजेशीर अंदाजात हार्दिक म्हणतो. त्यामुळे हा नवा गेम शो नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतही हार्दिकने गावाकडे राहणाऱ्या राणादा याची भूमिका साकारली होती. यात त्याचा रांगडेपणा प्रेक्षकांना विशेष भावला होता. त्यामुळे नव्या मालिकेतही तो काहीसा त्याच रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे.  या कार्यक्रमाव्यतिरिक्त तो 'क्लब 52' (Club 52) या सिनेमातही झळकणार आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीटेलिव्हिजनसेलिब्रिटी