हरभजन पडला आजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 17:43 IST
हरभजन सिंग गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मझाक मझाक में या नव्या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण करत आहे. या कार्यक्रमात तो ...
हरभजन पडला आजारी
हरभजन सिंग गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मझाक मझाक में या नव्या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण करत आहे. या कार्यक्रमात तो परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रीकरणाच्या दरम्यान तो आजारी पडला असल्याचे कळतेय. हरभजन नुकताच लंडनवरून परतला आहे. लंडनवरून आल्यावर आराम न करता त्याने लगेचच कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली याचाच त्याच्या तब्येतीवर परिणाम झाला असल्याचे कळतेय.