Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू तेव्हा तशी' मालिकेच्या सेटवर कलाकारांनी मारला हापूस आंब्यावर ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:39 IST

Tu Tevha Tashi: 'तू तेव्हा तशी' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे.

झी मराठी(Zee Marathi)वरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेत सौरभची भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने साकारली आहे तर अनामिकाची भूमिका शिल्पा तुळसकर(Shilpa Tulaskar)ने निभावली आहे. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना भावतो आहे. या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.

 प्रेक्षकांना या मालिकेत हापूस पार्टी होताना पाहायला मिळणार आहे आणि इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे.

 सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.

टॅग्स :स्वप्निल जोशी