Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाठकबाईंना किस करतानाचा राणादाने शेअर केला फोटो अन् म्हणाला- तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:16 IST

राणादाने पाठकाबाईंसोबतचा एक रोमाँटिक शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी सध्या तिचं मॉरिड लाईफ एन्जॉय करतायेत. लग्नानंतर हार्दिक सध्या कामात बिझी आहे तर पाठकाबाई संसारात रमल्या आहेत. दोघेही अनेकवेळा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत असतात. आताही राणादाने पाठकाबाईंसोबतचा एक रोमाँटिक शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

अभिनेत्री अक्षया देवधरचा आज वाढदिवस आहे. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस असल्यामुळे तो खास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रेटी मंडळींनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत तर चाहते ही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हार्दिकनेही त्याच्या पत्नीला एका वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिकने अक्षयासाठी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. अक्षयाबरोबरचा फोटो शेअर हार्दिकने लिहिले, ''माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात गोडवा आला”. तर दुसऱ्या फोटो हार्दिक अक्षयाला किस करताना दिसतो आहे.  “बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा”. असं हार्दिकने दुसरा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या दोघांच्या या फोटोची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे. 

 हार्दीक आणि अक्षया काही दिवसांपूर्वीच परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतले आहेत. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडिटयावर व्हायरल झाले होते. हार्दीक सध्या महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या बिग बजेट सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशी