स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' (Halad Rusali Kunku Hasala Serial) या मालिकेला अल्पावधीतच रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत बाळजाबाईची भूमिका पूजा पवार-साळुंखे (Pooja Pawar-Salunkhe) साकारत आहे. पूजा पवार-साळुंखे यांनी यापूर्वी 'आई कुठे काय करते' या मालिकेत महत्त्वाची भूमिका केली होती आणि तीन वर्षांच्या कालावधीनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. बाळजाबाईच्या भूमिकेतून पूजा यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान पूजा पवार-साळुंखे यांच्या दोन मुलींबद्दल तुम्हाला माहित आहे का? त्यातील एक मॉडेल आहे आणि दुसरी गुगल कंपनीमध्ये कार्यरत आहे.
अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलीचं नाव आहे अतिशा आणि नताशा. त्या दोघी पूजा यांच्याप्रमाणेच दिसायला सुंदर आहेत. पूजा यांची एक मुलगी अतिशा मॉडेलिंग क्षेत्रात आहे आणि दुसरी लेक नताशा थेट गुगल कंपनीमध्ये काम करत आहे. पूजा यांचा त्यांच्या दोन्ही मुलींच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे. आईचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे अतिशा आणि नताशा यशस्वी कामगिरी करत आहेत.
वर्कफ्रंटपूजा पवार-साळुंखे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. त्यांनी झपाटलेला, एक होता विदुषक यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, अजिंक्य देव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलंय. सध्या त्या मालिकाविश्वात सक्रीय आहेत. 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत त्या काम करताना दिसत आहेत.