Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका-सौमित्रच्या लग्नात गॅरी दिसला खुळखुळा वाजवताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 14:06 IST

राधिका व सौमित्र यांचं लग्न नुकतेच पार पडले.

माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. लवकरच राधिका आणि सौमित्रचा लग्न सोहळा रसिकांना पहायला मिळालं आहे. या सोहळ्यात लग्नाव्यतिरिक्त सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते गुरूनाथ उर्फ गॅरीनं. गॅरीदेखील या सोहळ्यात उपस्थित होता पण पाहुणा म्हणून नाही तर वाजंत्री म्हणून.

'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली ' माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरक्ष: राज्य करतेय. आता हि मालिका अतिशय विलक्षण वळणावर आली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकावरील सर्व आरोप दूर होऊन तिने पुन्हा एकदा कंपनीच्या कारभाराची सूत्र हातात घेतली आहेत.

राधिका आणि सौमित्रचे लग्न मोठ्या दिमाखात काल (२५ डिसेंबर) पार पडलं. यावेळी गुरूनाथदेखील उपस्थित होता. पण तो वाजंत्रीसोबत आला होता आणि चक्क खुळखुळा वाजवताना दिसला.

राधिका व सौमित्रचं लग्न पाहताना तो खूप उदास झाला होता.

राधिका व सौमित्रच्या विवाहानंतर आता ते त्यांच्या नवा संसार थाटताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठी