Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रायझिंग स्टार सीझन 2'च्या मंचावर गुरूदास मान येताच गहिवरला,वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 12:11 IST

छोट्या पडद्यावर गाण्याचा रिअॅलिटी शो रायझिंग स्टार सीझन 2 नॉन फिक्शन शो कॅटेगरीत नंबर वन शो बनला आहे.अल्पावधीतच या ...

छोट्या पडद्यावर गाण्याचा रिअॅलिटी शो रायझिंग स्टार सीझन 2 नॉन फिक्शन शो कॅटेगरीत नंबर वन शो बनला आहे.अल्पावधीतच या शोने रसिकांचीही पसंती मिळवली आहे.रसिकांमध्ये अधिक उत्सुकता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतातील कंटेस्टंस आपल्या गायकीने रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत. या शोमध्ये पंजाबी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता गुरदास मान 'रायझिंग स्टार 2'च्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये उपस्थित असणार आहे.याविषयी गुरदास मानने सांगितले की,“मी रायझिंग स्टारचा हा सीझन पहात आहे आणि मला सांगितलेच पाहिजे की या शोमध्ये टॅलेंटच कमी नाही.एक से बढकर एक कंटेस्टंट कमालीचे गातात.खरोखरच या सगळ्या कंटेस्टंटना या शोने एक स्टेज उपलब्द करून दिला आहे त्यासाठी शोच्या टीमचे जितके कौतुक करू तितके कमी आहे. त्यांची गुणवत्ता लाइव्ह पाहण्याची आणि दिलजित दोसांझ, शंकर महादेवन आणि मोनाली ठाकूर यांच्या सोबत पॅनेल वर येण्याची माझी इच्छा आहे.”गुरदास मान पुढे म्हणाला,“प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच, या शोने #उठाओसोचकीदीवार हा मौल्यवान संदेश सुद्धा दिला आहे जो आपल्या देशाच्या विकासासाठी मदत करेल. मला आठवते मी जेव्हा सुरूवात केली होती. तेव्हा येथे अनेक दिग्गज त्यावेळी होते सोलो आवाजाला तेव्हा काहीच संधी नव्हत्या. तसेच सोलो गायनाची कल्पना असलेल्या मला खात्री होती की मी आणि इतर सोलो कलाकारांचे भविष्य चांगले असणार आहे.आज, मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या ध्येयापर्यंत पोहचविल्या बद्दल आणि इतर सोलो कलाकारांसाठी मार्ग तयार केल्या बद्दल मी देवाचे आभार मानतो.”गुरदास मानचा मोठा चाहता असलेला दिलजित दोसांझने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायझिंग स्टारच्या पहिल्या सीझनमध्ये की 'बनू दुनिया दा' ही अतिशय मधुर गाणे सादर केले होते.पंजाबची शान एकत्रितपणे मंचावर पहायला मिळणे ही रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.Also Read:शंकर महादेवन यांनी सोहमला दिले हे वचनशंकर महादेवन, मोनाली ठाकूर आणि दिलजित दोसांझ सारख्या संगीतातील निष्णात गुरूंपुढे परफॉर्म करणे हे एक आव्हानच आहे.पण, रायझिंग स्टार 2 वरील स्पर्धक सोहम (10) आणि चैतन्य (12) यांनी प्रत्येकाच्या अपेक्षेपलीकडे कामगिरी केली. त्यांच्या असाधारण टॅलेंटने या अतिशय गुणवान जोडीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. सोहमच्या तबल्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले तर चैतन्यने गायलेल्या दगाबाज रे या प्रसिध्द बॉलीवूड गाण्याने सर्वांची मने जिंकली. इतकेच नाही तर शंकर महादेवन यांनी सोहमचे तबला वाजविण्याचे कौशल्य उस्ताद झाकीर हुसेन यांना दाखविण्याचे वचन दिले.