Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 18:19 IST

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला कोरोना पॉझिटीव्ह आलेत.

टीव्हीवरील राम-सीता अर्थात गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरमीतने याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली.  गुरमीतने लिहिले,माझी पत्नी देबिना आणि मी कोरोना पॉझिटीव्ह आहोत. आम्ही दोघे ठिक आहोत. घरातच स्वत:ला होम क्वॉरंटाईन केले आहे. गेल्या काही दिवसांत जे आमच्या संपर्कात आले आहेत कृपया त्यांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी. गुरमीतच्या पोस्टनंतर त्याचे फॅन्स ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतायेत. 

राम-सीताची साकारली भूमिकाछोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती.दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते. गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.

 

टॅग्स :गुरमीत चौधरी