Kaps Cafe Attack: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी कॅनडामध्ये 'Kaps Cafe' नावाचं एक छानसं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. गेल्याच आठवड्यात याचं ग्रँड ओपनिंग करण्यात आलं. त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
कॅनडामध्ये कपिल शर्माचा कॅफे ज्या इमारतीत आहे त्या इमारतीवर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला. तसेच 'Caps Cafe' वरही गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर कारमधून आले आणि गोळीबार करून तेथून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कॅनडामध्ये सुरू केलं 'कॅप्स कॅफे
अभिनय आणि कॉमेडीच्या पलीकडे जाऊन कपिलने आता नव्या क्षेत्रात उडी घेतली आहे. कपिल शर्माचं गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या आकर्षक थीममध्ये सजवलेले हे कॅफे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. गिन्नीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये कॅफेची सुंदर झलक शेअर केली होती. या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती थोड्याशा महाग आहेत.
एका व्हिडीओनुसार, येथे ५०० रुपयांपेक्षा कमी दरात काहीही मिळत नाही, त्यामुळे लोकांनी याची तुलना स्टार कॅफेसोबत केली आहे. कपिलच्या या नव्या प्रवासाबद्दल त्याचे सहकारी आणि मित्रांनीसुद्धा खूप आनंद व्यक्त केला. किकू शारदा, बलराज सियाल यांनी त्याचं अभिनंदन केलं होतं. त्याच कॅफेवर आता गोळीबार करण्यात आला आहे.