Join us

"सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, आरक्षण...", 'बिग बॉस'च्या घरात काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:39 IST

सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री झाली आहे.

'बिग बॉस' हा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो. हिंदीनंतर मराठीतही या शोची क्रेझ निर्माण झाली. रविवारी एकिकडे 'मराठी बिग बॉस'चा ग्रँड फिनाले झाले. तर दुसरीकडे 'बिग बॉस हिंदी'चा ग्रँड प्रीमिअर पार पडला. 'मराठी बिग बॉस' संपले असले तरी मनोरंजन मात्र थांबलेले नाही. 'हिंदी बिग बॉस'मध्ये मराठी चेहरेही सहभागी झाले आहेत. सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात जाताच त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश घेतल्यानंतर  गुणरत्न सदावर्ते यांनी घरातील इतर सदस्यांना स्वत:ची ओळख करुन दिली. यावेळी ते म्हणाले, "मी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, आरक्षण यासारख्या प्रकरणात लढलो आहे. महाराष्ट्रातून मराठा आरक्षण हटवण्यासाठी मी लढलो आणि जिंकलोदेखील".  यावर स्पर्धक रजत दलाल म्हणतो की, " मला कधी गरज पडली, तर मी नक्की तुमची आठवण काढेन". तर सदावर्ते म्हणाले की, "अरे भाई अशी वेळ कुणावरही येऊ नये".

गुणरत्न सदावर्ते हे मुळचे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) आणि मुंबईतून झालं आहे. त्याच्या पत्नीचं नाव जयश्री पाटील असून त्यांना झेन नावाची मुलगी आहे. गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला त्यांनी केलेला विरोध असो किंवा एसटी आंदोलन. ते कायम लोकांच्या नजरेत असतात. आता बिग बॉसच्या घरात ते काय खेळ खेळतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेसेलिब्रिटीसलमान खानबिग बॉस