Join us

"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार

By देवेंद्र जाधव | Updated: May 13, 2025 14:04 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि सध्या गुलकंद सिनेमात झळकलेली अभिनेत्री ईशा डेने वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्येला सामोरं जावं लागलं, याचा खुलासा केलाय

'गुलकंद' सिनेमाची (gulkand movie) सध्या सर्वांना चांगली उत्सुकता आहे. या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलंय. समीर चौघुले आणि सई ताम्हणकर याशिवाय प्रसाद ओक- ईशा डे (esha day) या कलाकारांची जोडी या सिनेमात पाहायला मिळतेय. सिनेमात ईशा डेने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. ईशाने गेल्या अनेक महिन्यांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये अभिनय करतेय. ईशाचं वजन अलीकडच्या काळात कमी झालेलं दिसलं. ईशाने अचानक वजन का कमी केलं? यामागचं कारण तिने सर्वांना सांगितलंय

म्हणून ईशाने वजन कमी केलं

अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत ईशाने वजन कमी का केलं याविषयी खुलासा केला. ईशा म्हणाली की, "वजनामुळे अनेक गोष्टी होतात. पीसीओडी, प्री डायबेटिक आलं होतं. डॉक्टरांनी मला हेच सांगितलं की, हे सगळं बरं होऊ शकतं पण सगळा प्रॉब्लेम हा वजनामुळे आहे. त्याच्यामुळे मला असं झालं होतं की, आपल्याला यामध्ये काही तक्रार करण्यासारखंच नाही. म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं की, उंची वाढव तर आपण नाही वाढवू शकत. पण वजन कमी करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, डायटेशिअनचं मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित डाएट करुन आता वजन कमी केलं. यामुळे जे सगळे आजार बरे होण्याजोगे होते ते बरे झाले."

ईशाच्या गुलकंदची चर्चा

'गुलकंद' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. या सिनेमात समीर चौघुले-सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक-ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस उतरल्या आहेत. या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ईशा डेने या सिनेमात रागिणी माने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ईशा आणि समीर चौघुलेंचा भन्नाट अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. याशिवाय ईशा आणि प्रसाद ओक यांची खास केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुलेसई ताम्हणकरप्रसाद ओक मराठी अभिनेतामराठी चित्रपट