द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये संकेत भोसलेने केली संजय दत्त आणि सलमान खान यांची मिमिक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:48 IST
अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच ...
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये संकेत भोसलेने केली संजय दत्त आणि सलमान खान यांची मिमिक्री
अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच मजा येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक बदलल्यानंतर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील विनोदाचा स्तर आता उंचावत असून स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच अवघड बनत चालली आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या एका खास कार्यक्रमात आला लवकरच संकेत भोसले झळकणार आहे. संकेत संजय दत्त आणि सलमान खान यांची खूपच छान नक्कल करतो. त्याने या कार्यक्रमात देखील त्यांची खूपच छान नक्कल करून दाखवली. याविषयी संकेत सांगतो, “संजूबाबा आणि सलमानभाई या दोघांची नक्कल करणे हा एक छान अनुभव होता. या कार्यक्रमात काही उत्कृष्ट विनोदवीर असून त्यांना विनोद सादर करताना पाहणं आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात खूप मजा आली.”रणबीर कपूरला संजय दत्तच्या बायोपिकसाठी संजय दत्तच्या बोलण्याची ढब आणि विशिष्ट लकबी यांची नक्कल करण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम संकेतने केल्याने तो अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. संकेतने टीव्हीवरील कार्यक्रमात विविध अभिनेत्यांच्या नकला करून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला होता. त्यानंतर त्याने अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये तसेच ‘स्टार परिवार पुरस्कार’ सोहळ्यासारख्या कार्यक्रमांमधून नकला सादर केल्या आहेत.‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील अक्षय, साजिद आणि श्रेयस या तीन परीक्षकांसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत संकेत सांगतो, माझा अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता आणि ते तिघे सेटवर एकत्र असले की खूप धमाल मस्ती करतात. अक्षयसरांचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे खांबावर यशस्वीपणे चढून घंटा वाजविणं हे आहे. त्यांना खांबावर चढताना पाहून मी थक्कच झालो होतो.Also Read : द ड्रामा कंपनी फेम संकेत भोसलेला त्याचे अश्रू का आवरले नाहीत?