Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: 'प्रत्येकाला प्रेमात पाडणारं गाणं'; 'गोव्याच्या किनाऱ्यावं'च्या यशानंतर सुहृद वार्डेकरने पुन्हा दिग्दर्शित केलं नवं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:02 IST

Suhrud wardekar: गोव्याच्या किनाऱ्यावंला मिळालेल्या यशानंतर सुहृदने आणखी एक गाणं दिग्दर्शित केलं आहे. या गाण्याविषयी नुकत्याच त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

'गोव्याच्या किनाऱ्यावं' या गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुहृद वार्डेकर (Suhrud wardekar). या गाण्यामुळे सुहृद रातोरात प्रकाशझोतात आला. हे गाणं स्वत: सुहृदने दिग्दर्शित केलं होतं. विशेष म्हणजे गोव्याच्या किनाऱ्यावंला मिळालेल्या यशानंतर त्याचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं त्याने स्वत: दिग्दर्शित केलं असून हे प्रेमगीत लोकप्रिय होताना दिसत आहे.

"वाचवू कसे हे मी दिग्दर्शित केलेलं दुसरं गाणं आहे. मला ज्या गोष्टी गाण्यातून सादर करायच्या होत्या त्या मी या गाण्यातून उत्तमरित्या मांडू शकलो याचाच मला खरा आनंद आहे. प्रत्येक तरुणाईला प्रेमात पाडावं असं हे गाणं आहे. या गाण्यातून प्रेमभाव उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे गाणं ऐकल्यावर प्रत्येकाला खोल प्रेमसागरात बुडाल्याचा फिल येईल", असं सुहृद वार्डेकर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या निमित्ताने मला इलाक्षी गुप्तासोबत काम करायची संधी मिळाली. इलाक्षी खरंच खूप गुणी अभिनेत्री आहे. पाचगणीच्या निसर्गसानिध्यात हे गाणं शूट करण्यात आलं आहे.  ज्या प्रमाणे तुम्ही माझं पहिलं गाणं लोकप्रिय केलं. त्याच पद्धतीने हे गाणं सुद्धा तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे."

दरम्यान, सुहृदच्या गोव्याच्या किनाऱ्यावं या गाण्याने जवळपास ३०० मिलिअन व्ह्यूजचा टप्पा क्रॉस केला आहे. त्याचप्रमाणे त्याचं हे नवं गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं दिसून येत आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन