Join us

लॉटरी लागली! 'आई कुठे काय करते' फेम अश्विनीचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराची मिळाली चावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 12:54 IST

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करते आहे. यात तिने अनघाची भूमिका साकारली आहे. या मालिकेनंतर अश्विनीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अश्विनीचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने लिहिले की, प्रचंड स्वप्नं पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय...... स्वप्नं पूर्ण होतातंच. आज एक स्वप्न पूर्ण झालं. अश्विनीच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

अश्विनी महांगडे हिला म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत कलाकार कोट्यातून गोरेगावमध्ये घर मिळाले आहे. नुकत्याच तिला घराच्या चाव्या मिळाल्या आहेत. अशाप्रकारे सातारकर असलेली अश्विनी मुंबईकर झाली आहे. तिचे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.  

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका