सुरभीला मिळाले खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 18:22 IST
सुरभी ज्योती आणि सुरभी चंदना या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघांनी कबूल है या मालिकेत एकत्र काम केले ...
सुरभीला मिळाले खास गिफ्ट
सुरभी ज्योती आणि सुरभी चंदना या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघांनी कबूल है या मालिकेत एकत्र काम केले होते. सुरभी चंदना सध्या इश्कबाज या मालिकेत काम करत आहे. ही मालिका मिळाल्याच्या आनंदात सुरभी ज्योतीने आपल्या सुरभी चंदना या लाडक्या मैत्रिणीला एक खूपच चांगले गिफ्ट दिले आहे. सुरभी चंदनाला एक खूप चांगल्या मालिकेत एक चांगली भूमिका साकारायला मिळतेय हे जेव्हा सुरभी ज्योतीला कळले ,तेव्हा तिने तिलाएक ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिले. या मालिकेतील सुरभीच्या व्यक्तिरेखेची अ या अक्षरापासून सुरुवात असल्याने तिने अ कोरलेले ब्रेसलेट तिला दिले आहे. सध्या हे ब्रेसलेट ज्योती मालिकेतही वापरत आहे. मला हे ब्रेसलेट खूपच आवडले होते. सुरभीचे हे गिफ्ट या कार्यक्रमाच्या निर्मात्या गुल खान यांना मी दाखवले असता त्यांनी मी हे मालिकेत घालावे असे मला सुचवले. मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला ते ब्रेसलेट पूर्णपणे सूट होते असे त्यांचे म्हणणे होते असे सुरभी सांगते.