दोस्त मिल गया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:26 IST
रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत वत्सल सेठ आणि इशिता दत्ता प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेतली त्यांची केमिस्ट्री लोकांना आवडत आहे. ...
दोस्त मिल गया
रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत वत्सल सेठ आणि इशिता दत्ता प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेतली त्यांची केमिस्ट्री लोकांना आवडत आहे. पण त्याचसोबत चित्रीकरणाच्यादरम्यानही ते दोघे एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच एका चित्रीकरणाच्यादरम्यान इशिताची साडी फॅनमध्ये अडकून अपघात होणार होता. पण त्यावेळी वत्सलनेच तिला वाचवले. आज ते दोघे खूप चांगले मित्रमैत्रीण बनले आहेत. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी खूपच सारख्या असल्याने आमच्या दोघांचे जास्त पटते. आम्हाला दोघांनाही केक, पेस्ट्री खूपच आवडतात. त्यामुळे आम्ही एकमेकांसाठी पेस्ट्री घेऊन येतो असे वत्सल सांगतो. वत्सल हा माझा केवळ एक सहकलाकारच नाही तर माझा चांगला मित्र आहे. त्याच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात असे इशिता सांगते.