Join us
Daily Top 2Weekly Top 5

Good News! कपिल शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:37 IST

कपिल शर्माने ऑफिशियल अकाउंटवरून दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे.

द कपिल शर्मा शो पुढील महिन्यात बंद होणार असल्याच्या वृत्ताने सोशल मीडियावर खळबळ माजली होती. पण आता या वृत्तामागचे खरे कारण समोर आणत कपिल शर्माने ट्विट केले आहे जे खूप व्हायरल होत आहे. 

कपिल शर्माने लिहिले की, द कपिल शर्मा शो पुढील महिन्यात ऑफ एअर होणार आहे. कारण मला माझ्या पत्नीसोबत घरी रहायचे आहे. कारण मी माझ्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करू शकेन. असे पहिल्यांदा झाले आहे की कपिल शर्माने ऑफिशिएल अकाउंटवरून दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची आनंदाची वार्ता सांगत चाहत्यांसाठी स्पेशल मेसेज शेअर केला आहे. 

कपिल शर्मा शो फेब्रुवारीत दुसऱ्या आठवड्यात ऑफ एअर होणार आहे. या माहिन्याच्या सुरूवातीला कपिल शर्माने एक ट्विट करून चकीत केले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, मी आनंदाची बातमी देत आहे. या ट्विटनंतर चाहत्यांनी तर्कवितर्क लावायला सुरूवात केली होती की कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा बनणार आहे. मात्र एका प्रमोशनल कॅम्पेन निघाले. या माध्यमातून कपिलने नेटफ्लिक्ससोबत नवीन शोची माहिती दिली होती.

कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीचे वृत्त पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये समोर आले होते. खरेतर कपिल शर्माचा एक फॅमिली फोटो समोर आला होता ज्यात त्याची पत्नी गिन्नी कपिलची आई आणि मुलगी अनायरासोबत दिसली होती. या फोटोत गिन्नी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. जो पाहून ती लवकरच आई बनणार असल्याचा तर्क लावला जात आहे.

टॅग्स :कपिल शर्मा